दिल्लीतील सर्व शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालये रविवारपर्यंत बंद ! ‘या’ कारणामुळे स्थानिक प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत 1978 नंतर 45 वर्षांत प्रथमच यमुना नदीने विक्रमी पाणीपातळी गाठली आहे. दिल्लीतील सखल भाग पुराच्या पाण्यात बुडाला आहे.मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन, जिल्हा दंडाधिकारी मनीष कुमार वर्मा यांच्या आदेशानुसार, जिल्हा शाळा निरीक्षक डॉ. धरमवीर सिंह यांनी 14 जुलै रोजी इयत्ता 12 वीपर्यंतच्या सर्व बोर्डाच्या शाळा बंद केल्या आहेत.
यमुनेचे पाणी उच्च प्राथमिक शाळा लतीफपूरपर्यंत पोहोचले आहे. पाणी शाळेत पोहोचल्याने नजीकच्या प्राथमिक शाळेत लतीफपूर येथे विद्यार्थ्यांना शिकवले जात होते. अशात स्थानिक प्रशासनाने ही आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या सर्व शाळा रवीवारपर्यंत बंद राहणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही लिहिले असून राजधानीत होणाऱ्या जी-20 परिषदेचा हवाला दिला आहे.

केजरीवालांनी आपल्या पत्रात लिहिले, “बुधवार दुपारी 1 वाजता दिल्लीतील यमुनेची पातळी 207.55 मीटरवर पोहोचली आहे. ते धोक्याच्या चिन्हाच्या (205.33 मीटर) वर आहे. याआधी 1978 मध्ये यमुनेची कमाल पातळी 207.49 मीटर होती. त्यावेळी दिल्लीत पूर आला होता आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. आता 207.55 मीटरच्या पातळीवर यमुनेत कधीही पूर येऊ शकतो.’





