महाराष्ट्राबाहेरही आकाशवाणीच्या मराठी बातम्या लोकप्रिय…

पुणे – आकाशवाणीच्या न्यूज ऑन एआयआर या ऍपवर पुणे, बंगळुरु, हैदराबाद, मुंबई आणि कोचीमधील बहुसंख्य कामकाजी वर्गातील श्रोते असल्याचं दिसून आलं आहे. या शहरांमधील आकाशवाणी लाईव-स्ट्रीम्सच्या श्रोत्यांपैकी 75 टक्के श्रोते 25 ते 64 वर्षे वयोगटातील आहेत. सर्वोच्च शहरांसाठी लोकसंख्यात्मक वितरण या नवीन मोजमापामुळे हे निष्कर्ष काढण्याची सोय झाली आहे.
न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचे लाईव-स्ट्रीम्स सर्वात लोकप्रिय असलेल्या भारतातील अग्रणी शहरांच्या ताज्या मानांकनामध्ये चेन्नई आणि अहमदाबाद यांचा क्रमांक थोडा वर सरकला आहे तर दिल्ली राजधानी क्षेत्र आणि जयपुर या क्रमवारीत खाली घसरले आहेत. पुणे शहर पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पाठोपाठ बंगळुरु आणि हैदराबादचा क्रमांक लागतो.
सर्वोच्च एयआयआर स्ट्रीम्सच्या मानांकनांमधील मोठ्या बदलांमध्ये, रेनबो कन्नड यानं दोन स्थानांनी झेप घेतली आहे, तर अस्मिता मुंबई आणि एफएम गोल्ड दिल्ली यांच्या मानांकनामध्ये घट दिसून आली आहे. विविध भारती नॅशनल या मानांकनामध्ये आघाडीवर आहे त्यापाठोपाठ एआयआर न्यूज ट्वेंटी फोर बाय सेवन आणि एआयआर मल्याळम यांचा क्रमांक आहे.
आकाशवाणीच्या 240 हून अधिक रेडियो सेवा न्यूज ऑन एआयआर ऍपवर लाईव-स्ट्रीम केल्या जातात. या ऍपवरील स्ट्रीम्सचे श्रोते केवळ भारतातच नाही तर 85 हून अधिक देश आणि 8 हजारहून अधिक शहरांमध्ये आहेत.





