Nagar: अकोले ग्रामीण रुग्णालयात सर्वरोग निदान शिबीर

अकोले: अकोले ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आदिवासी भागातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी सर्व रोग निदान, उपचार व दंतरोग शिबिर व शस्त्रक्रिया मोफत शिबिराचे दि ८ ते ११ जानेवारी असे ४ दिवस आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बाळासाहेब मेहेत्रे यांनी दिली.
अकोले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मेहेत्रे यांनी सांगितले की, अकोले ग्रामीण रुग्णालयात चार दिवसांचे सर्वरोग निदान, उपचार व दंतरोग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन दि. ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आमदार डाॅ.किरण लहामटे यांचेहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर हे राहणार आहे. भाजपाचे मा.जि.प.सदस्य जालिंदर वाकचाैरे, डाॅ.स्वप्निल लाळे (संचालक,म.रा.आरोग्य सेवा), डाॅ.कपिल आहेर (उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक परिमंडळ), डाॅ.नागोराव चव्हाण (जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा सा.रुग्णालय अहिल्यानगर), डाॅ.बापूसाहेब नागरगोजे ( जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.अहिल्यानगर), सिद्धार्थकुमार मोरे (तहसीलदार,अकोले) डाॅ.. ए.टी माने (बीडीओ पं.स. अकोले),डाॅ. शिवशंकर लांडे (अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, अहिल्यानगर), डाॅ. बाळासाहेब मेहेत्रे (वैद्यकीय अधीक्षक, ग्रा.रु.अकोले), डाॅ. श्यामकांत शेटे (ता.आरोग्य अधिकारी,अकोले),डाॅ.अशोक काैटकर (वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रु.कोतुळ), डॅा.रामनाथ दिघे (वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रु.राजुर),डाॅ.अमित काकड (वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रु.समशेरपूर) ,डाॅ.राहुल कवडे (वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु.कोतुळ), डाॅ.संकेत गडाख (वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु.अकोले), डाॅ..सुरेखा करवंदे (वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु.अकोले), डाॅ.दिलीप लोहरे (वैद्यकीय अधिकारी ग्रा.रु.अकोले) आदींच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
या चार दिवशीय शिबिरामध्ये लहान शस्त्रक्रिया, मोठ्या शस्त्रक्रिया व सर्व आजारांवर तपासणी व उपचार मोफत केले जाणार आहे. या शिबिरात कुटुंब कल्याण शस्त्रकि्येची सुविधाही उपलब्ध आहेत. ८ ते ११ जानेवारी रोजी अकोले ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या या शिबिराचा अकोले तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॅा.बाळासाहेब मेहेत्रे यांनी केले आहे.





