Alia Bhatt : आलिया दमदार भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार! अॅक्शन चित्रपट ‘अल्फा’तील फर्स्ट लूक रिलीज
Alia Bhatt : अल्फा या आगामी चित्रपटातील अभिनेत्री आलिया भट्टचा दमदार लूक रिलीज करण्यात आला असून, चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट्टने आत्तापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारलेल्या आहेत. तिच्या सगळ्याच भूमिकचे कौतुक चाहते करत असतात. आलियाने स्वतःचा एक फॅनबेस तयार केला आहे. बॅालीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिच्या आगामी ‘अल्फा’ या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाची जोरदार चर्चा असून, या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या लूकने चित्रपटाची रिलीजची उत्सुकता आणखी वाढवली आहे. तसेच चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
यश राज फिल्म्सच्या बहुप्रतिक्षित ‘अल्फा’ या चित्रपटाची थिएटर रिलीजची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार हा चित्रपट १० जुलै २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, आलिया भट्टच्या दमदार लूकची जोरदार चर्चा होत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये आलियाचा दमदार लूक सर्वांनाचा बुचकाळ्यात टाकणारा ठरत आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमा आणि कट्सच्या खुणा दिसत असून ती एखाद्या तीव्र संघर्षातून बाहेर पडल्यासारखी दिसते. या लूकमुळे चित्रपटात अॅक्शन आणि थ्रील दोन्हीही पाहायला मिळणार असल्याचा अंदाजा बांधला जात आहे. आत्तापर्यंत रोमँटिक आणि भावनिक भूमिका साकारलेली आलिया एका वेगळ्याच भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात आलिया भट्टसोबत अभिनेत्री शर्वरी वाघ देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच चित्रपटात अभिनेता बॉबी देओल, ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत. सध्या अनिल कपूर त्यांच्या सुबेदार चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
अल्फा या चित्रपटाचे दिग्दर्शन द रेल्वे मेन ही वेबसिरीज करणारे दिग्दर्शक करणार आहेत. विशेष म्हणजे ‘अल्फा’ हा आलिया भट्टचा यश राज फिल्म्ससोबतचा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यानंतर चाहते कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : Amol Mitkari : व्ही. के. सिंगकडून पिंकी माळीच्या कुटुंबीयांना धमकी? अमोल मिटकरींच्या ट्वीटने खळबळ





