आलिया, शर्वरीचा अॅक्शन अवतार! अल्फा चित्रपटातील भूमिकेसाठी ३ महिने घेतली मेहनत, दिग्दर्शक कौतुक करत म्हणाला…

Alia Bhatt | Sharvari | आलिया भट आणि शर्वरी या दोन्ही अभिनेत्री अल्फा नावाच्या चित्रपटातून एका अनोख्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात आलिया आणि शर्वरी अॅक्शन करताना पाहायला मिळणार आहेत. अॅक्शन डायरेक्टर क्रेग मॅकक्रे यांच्याकडून अॅक्शनचे प्रशिक्षण या दोघी घेत आहेत. यासाठी त्या खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या मेहनतीचे कौतुक मॅकक्रेने केले आहे. अल्फा हा चित्रपट एक अॅक्शन चित्रपट असणार आहे.
या चित्रपटात आलिया आणि शर्वरीला प्रशिक्षण देणारे अॅक्शन डायरेक्टर क्रेग मॅकक्रेने चित्रपट आणि अभिनेत्रीशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. अॅक्शन डायरेक्टरने सांगितले की, सुरुवातीला दोन्ही अभिनेत्रींनी या चित्रपटात घेणार नव्हते. मात्र, दोन्ही अभिनेत्रींची मेहनत पाहून मॅकक्रेने आलिया आणि शर्वरी यांना या चित्रपटात कास्ट केले, असा खुलासा त्याने केला आहे.
क्रेग मॅकक्रे बऱ्याच काळापासून बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये अॅक्शन सीनच्या डिरेक्शनचे काम करत आहेत. त्याने टायगर श्रॉफ, शाहरुख खान आणि अक्षय कुमार सारख्या कलाकारांच्या चित्रपटांसाठी अॅक्शन सीन्स तयार केले आहेत. त्यामुळे अल्फामध्ये आलिया आणि शर्वरीचे अॅक्शन सीन्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
बॉलिवूड हंगामाशी बोलताना, अल्फा चित्रपटाचे अॅक्शन डायरेक्टर क्रेग मॅकक्रॅ म्हणाला, “हा माझा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे, ज्यामध्ये दोन महिला मुख्य भूमिकेत आहेत. सुरुवातीला मला थोडीशी खात्री नव्हती, कारण महिला प्रमुख भूमिका असलेला अॅक्शन चित्रपट अभिनेत्रींच्या कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतो.
आलिया आणि शर्वरीचे कौतुक करताना दिग्दर्शक म्हणाला, चित्रपट सुरू होण्यापूर्वी आलिया आणि शर्वरीने ३ महिने प्रशिक्षण घेतले. त्या दोघींसोबत काम करणे खूप मजेदार आणि प्रेरणादायी होते. दोघेही केवळ मेहनती नाहीत तर खूप चांगली माणसे देखील आहेत, असे त्याने सांगितले.





