Alia Bhatt : आलिया भट्टचा नवा अवतार.! आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; फोटो सोशलवर व्हायरल…

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अखेर आपल्या पुढच्या चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या बहुप्रतिक्षित चित्रपटातील आलियाचे पहिले फोटो सोशल मीडियावर लीक झाले असून, ते सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. आलियाचा लुक पाहून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि कौतुकाचं वातावरण आहे.
या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर आणि विकी कौशल हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आलिया ७० च्या दशकातील अभिनेत्रींसारखी दिसत आहे. तिने साडी नेसली आहे, केसांचा मोठा जुडा बांधला आहे आणि नोजपिनसह तिचा लुक अत्यंत ग्रेसफुल दिसतो. आलियाच्या या लुकला अधिक उठावदार बनवतो तो तिचा हेवी आय मेकअप.
“भन्साळी आणि रणबीरला पुन्हा एकत्र पाहण्याची उत्सुकता”
‘लव्ह अँड वॉर’च्या कथेबद्दल अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. मात्र आलिया, रणबीर आणि विकी यांचा तगडा अभिनय पाहण्यासाठी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.
गेल्या वर्षी एका मुलाखतीत आलियाने सांगितले होते, “एक प्रेक्षक म्हणून मला सर्वाधिक आनंद आहे तो म्हणजे संजय सर आणि रणबीर इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करताना पाहण्याचा.” “विकी आणि मी पुन्हा एकत्र काम करतोय, रणबीर आणि विकीने ‘संजू’मध्ये जादू केली होती. त्यामुळे हा चित्रपट अनेक भन्नाट कॉम्बिनेशन्सने भरलेला आहे.”
या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील एका कार्यक्रमात रणबीर कपूरने सांगितले होते, ‘लव्ह अँड वॉर’ हा प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असलेला प्रोजेक्ट आहे. आलिया आणि विकी सारख्या दमदार कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणं आणि उस्ताद भन्साळींचं दिग्दर्शन मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
मी त्यांच्यासोबत १७ वर्षांपूर्वी काम केलं होतं, आणि आजही मला असं वाटतं की संजय लीला भन्साळींसारखा व्यक्ति मी अजून पाहिलेला नाही – जो भारतीय भावना, संस्कृती आणि संगीत इतकं खोलवर समजतो.” असं देखील ती म्हणाली.





