Love & War Film: ‘लव्ह अँड वॉर’मधील आलिया भटचा पहिला लुक समोर; अभिनेत्री जीनत अमान यांच्याकडून कौतुक
Love & War Film: ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय लीला भन्साळी यांनी सांभाळली

Love & War Film: ‘लव्ह अँड वॉर’मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट एकत्र पाहायला मिळणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटातील रणबीर कपूरचा पहिला लुक समोर आणल्यानंतर आता आलिया भटचा लुक समोर आला आहे.
‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातील आलिया भट्टचा पहिला पोस्टर रिलीज केला आहे. यामध्ये आलिया तिच्या आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या आणि अनोख्या अंदाजात दिसत आहे. या पोस्टरमध्ये आलिया कॅबरे थीममधील लूकमध्ये दिसत आहे. अनेकांनी सोशल मिडियावर कमेंट करत तिच्या लुकचे कौतुक केले आहे. आलिया भटच्या या कॅबरे लूकवर काहींनी तिची तुलना अभिनेत्री जीनत अमान यांच्यासोबत केली आहे.
आलियाच्या या लुकचे जीनत अमान यांनी कौतुक केले आहे. चित्रपटातील आलियाच्या पोस्टरवर कमेंट करताना जीनत अमान यांनी लिहिले, “वा! अखेर संजय लीला भन्साळी यांनी शो गर्लला सादर केलेच.”
View this post on Instagram
यासोबत त्यांनी जांभळ्या रंगाच्या हार्टचे इमोजीही शेअर केले. जीनत अमान यांच्या या कमेंटवर आलियानेही, “जीनत मॅम, खूप खूप धन्यवाद. आम्ही सेटवर तुमच्याबद्दल खूप बोलायचो, त्यामुळे तुमची ही कमेंट माझ्यासाठी आणखी खास आहे,” असे लिहिले आहे. Love & War Film
कधी प्रदर्शित होणार ‘लव्ह अँड वॉर’?
‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय लीला भन्साळी यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात आलिया भट आणि रणबीर कपूरसोबत विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा प्रोजेक्ट रणबीर आणि संजय लीला भन्साळी यांच्यात २००७ मध्ये आलेल्या रणबीरच्या ‘सावरिया’ या पदार्पणाच्या चित्रपटानंतर पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी, आलियाने २०२२च्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या बायोपिकसाठी संजय लीला भन्साळींसोबत काम केले होते. Love & War Film
हेही वाचा:





