‘रामायण’ चित्रपटातून आलिया भट्ट बाहेर? सीता मातेच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

मुंबई – नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा मेगा बजेट चित्रपट असणार असून यात रणबीर कपूर रामच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सीता मातेच्या भूमिकेत आलिया भट्ट दिसणार आहे. मात्र आता या चित्रपटातून आलियाचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात आता साऊथची अभिनेत्री साई पल्लवी दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे या चित्रपटात रणबीर रामाच्या आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या अपयशानंतर लोकांचे लक्ष नितेश तिवारीच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाकडे वळले आहे. आदिपुरुष चित्रपटातील कलाकारांचे पोशाख आणि संवाद यावरुन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यामुळे आलियानं या सिनेमातुन काढता पाय घेत सीतेची भुमिका साकरणार नसल्याचं बोललं जात आहे.
याशिवाय नितेश तिवारीने ‘केजीएफ’च्या रॉकी भाईला ‘रामायण’ चित्रपटातील रावनाची भूमिका ऑफर केली होती तशा बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र रॉकी भाईने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यास नकार दिला आहे. यशला त्याच्या चाहत्यांना निराश करायचे नाही. केजीएफ नंतर त्याच्या चाहत्यांना त्याला फक्त हिरो म्हणून पहायला आवडते, त्यामुळे कदाचित लोक त्याला खलनायकाच्या भूमिकेत स्वीकारू शकणार नाहीत म्हणून त्याने ही भूमिका नाकारल्याची चर्चा सुरु झाली आहे.
समोर आलेल्या माहिती नुसार, निर्माते 2023 डिसेंबर पर्यंत चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहेत. ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर होईल असा अंदाज आहे. ‘रामायण’चे निर्माते अल्लू अरविंद, मधु मंतेना आणि नमित मल्होत्रा असतील. रणबीर कपुर हा अॅनिमल चित्रपटात दिसणार आहे.





