आलिया भट करतेयं ‘या’ आजाराचा सामना; स्वत: केला खुलासा

Alia Bhatt | बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा ‘जिगरा’ चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. अलीकडेच एका मुलाखतीत आलियानं तिला असलेल्या एका गंभीर आजाराविषयी सांगितले. आलियाला ADHD अर्थात अटेंशन डिफीसिएट हायपरअॅक्टिव्ह डिसऑर्डर आजार असल्याचे तिने सांगितले आहे.
याबाबत सांगताना आलिया म्हणाली की ‘लहानपणी अनेकवेळा मी वर्गातील मुलांपासून दूर राहायची आणि कधी-कधी बोलत असताना अचानक राग यायचा . या आजारामुळे माझ्याकडे अजिबात धीर नव्हता. मी काही दिवसांपूर्वी एक सायकोलॉजिकल टेस्ट केली, ज्यात एक गोष्ट समोर आली की माझ्यात ADHD ची लक्षण दिसून येत आहेत. या आजारामुळे अजिबात धैर्य राहत नाही. ‘
आलियाला याविषयी काही माहित नव्हतं. जेव्हा तिनं टेस्ट केली त्यानंतर तिला हे कळालं. पण तिला कॅमेऱ्यासमोर खूप चांगलं आणि शांत वाटतं. याशिवाय ती जेव्हाही मुलगी राहासोबत वेळ घालवते तेव्हा ती खूप शांत राहते. ते क्षण सर्वोत्तम असल्याचे आलिया सांगते.
काय आहे ADHD आजार?
ADHD हा एक न्यूरोडेव्हलपमेंट संबंधीत आजार आहे. हा आजार लहाणपणी होतो आणि आपण मोठे झालो तरी राहतो. त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या रोजच्या कामावर आणि आयुष्यावर परिणाम होतो. अशा व्यक्तीला कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यास अडचणी निर्माण होतात.
आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, हा चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. चित्रपटात आलिया आणि वेदांग भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत दिसतात. या चित्रपटाची संपूर्ण कथा या दोघांभोवती फिरते. या चित्रपटाचे दिग्दर्शन वासन बाला यांनी केले आहे.
हेही वाचा:
Omar Abdullah swearing : उमर अब्दुल्ला यांचा १६ ऑक्टोबरला शपथविधी





