नवी दिल्ली – अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि त्यांच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री याचे एक प्रतिनिधी म्हणून उद्यापासून भारताला भेट देणार आहे. ते बेंगळुरू इथे होणाऱ्या एअरो इंडिया 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवादही साधणार आहेत. 6 ते 12 फेब्रुवारीपर्यंत ते भारतात असतील. आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि जागतिक सहभागाच्या माध्यमातून कोणत्याही परिसस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण करणे, लवचिकता निर्माण करणे या विषयावरील संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेतही ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या या भेटीमुळे धोरणात्मक भागीदारीसाठीचा सुलभ संवाद सुरू होऊ शकणार आहे. जनरल सय्यद चनेग्रीहा भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांचीही भेट घेणार आहेत. आपल्या भारत भेटीच्या दरम्यान जनरल सय्यद चनेग्रीहा संरक्षण अंतराळ यंत्रणेच्या छायाचित्र प्रक्रिया आणि विश्लेषण केंद्र, खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, तसेच आयएनएस हंसा या प्रमुख नौदल विमान वाहतूक प्रशिक्षण आस्थापनेसह अनेक लष्करी संस्थांना भेट देणार आहेत. यासोबतच ब्राह्मोस एअरोस्पेस, गोवा शिपयार्ड लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एल अँड टी डिफेन्स आणि भारत फोर्ज यांसह संरक्षण आणि हवाई अंतराळ क्षेत्रातील एअरोस्पेस सार्वजनिक आणि खाजगी संस्तांनाही ते भेट देणार आहेत.