“हनुमान म्हणजे राक्षसी देव…”, ट्रम्पच्या जवळच्या व्यक्तीचे वादग्रस्त विधान ; मूर्तीवरुन मोठा वाद

Alexander Duncan। टेक्सासमधील शुगर लँड याठिकाणी स्थापित केलेल्या भगवान हनुमानाच्या ९० फूट उंच पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. हा अमेरिकेतील तिसरा सर्वात उंच पुतळा आहे आणि उत्तर अमेरिकेतील भगवान हनुमानाचा सर्वात मोठा पुतळा मानला जातो. तथापि, टेक्सास रिपब्लिकन नेते अलेक्झांडर डंकन यांनी या पुतळ्याबाबत वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे हिंदू समुदाय संतप्त झाला आहे.
अलेक्झांडर डंकन यांनी हिंदूविरोधी विधान करत म्हटले आहे की, “अमेरिका एक ख्रिश्चन राष्ट्र आहे, मग आपण खोट्या हिंदू देवाची मूर्ती का उभारत आहोत?” या विधानानंतर, हिंदू अमेरिकन फाउंडेशन (HAF) ने याला हिंदूविरोधी द्वेष म्हटले आहे आणि डंकनवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भगवान हनुमानाच्या मुर्तीवर वादग्रस्त विधान Alexander Duncan।
अमेरिकेच्या टेक्सास राज्या भगवान हनुमानाची ९० फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती स्टॅच्यू ऑफ द युनियन म्हणून ओळखली जाते. या मुर्तीवर रिपब्लिकन पक्षाच्या अलेक्झांडर डंकन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अलेक्झांडरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, आपण आपल्या टेक्सासमध्ये खोट्या हिंदू देवाची खोटी मूर्ती का उभारत आहोत? आपण एक ख्रिश्चन राष्ट्र आहोत. या विधानामुळे अमेरिकेतील हिंदूंमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. केवळ अलेक्झांडरच नाही, तर अनेक स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील हनुमान भगवंताच्या मुर्तीला डेमॉन गॉड म्हटले आहे. दरम्यान ,डंकन यांच्या या विधानावरून देशासह जगभरातून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे.Alexander Duncan।




