विद्यार्थ्याला शिक्षक, शिपायाने केली बेदम मारहाण; पहा व्हिडिओ

आळेफाटा – ज्ञानमंदिर महाविद्यालय आळे येथे अकरावीच्या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाविषयी शेरो-शायरी केली म्हणून चिडून जाऊन शिक्षक आणि शिपायाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समूहातील एका विद्यार्थ्याने शेरो-शायरी केली केली म्हणून त्या विद्यार्थ्याचे केस ओढून, लाथा-बुक्यांनी अमानुषपणे मारहाण करत असल्याचे सदर व्हिडीओत दिसत आहे. या मारहाणीच्या घटनेचा सर्वच पालकांनी निषेध नोंदवला आहे. त्यामुळे संबंधित पालकांनी शिक्षक, व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनची तातडीची बैठक बोलावून सदरच्या गोष्टीबाबत खुलासा मागवला आहे.
आळेफाटा: शिक्षक, शिपायाकडून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; पाहा व्हिडीओ pic.twitter.com/3WOsZv29hl
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 21, 2023
बैठकीत अधिकाऱ्यांनी शिक्षकांकडून भविष्यात विद्यार्थ्यांविषयी मारहाणीचे असे प्रसंग घडणार नाही आणि संबंधित शिक्षक आणि शिपायावर आम्ही कारवाई करू अशा पद्धतीचे आश्वासन दिले. सदर घटनेमुळे विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये घबराटीचे वातावरण आहे.
आळेफाटा पोलीस स्टेशनचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी अद्याप पालकांकडून कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा दाखल केला नाही असे सांगण्यात आले आहे.





