आळेफाटा,(वार्ताहर)- आळेफाटा या महसुली गावास चाळकवाडी या तलाठी कार्यालयाला चुकीच्या पद्धतीने जोडले आहे. आळेफाटा तलाठी सजा पुन्हा वडगाव आनंद या मूळ कार्यालयाला जोडल्याशिवाय मी शांत राहणार नाही. लवकरच शासन स्तरावर निर्णय पारित करून आपणास आनंदाची बातमी देण्याचे काम मी केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी केले. आमदार अतुल बेनके यांनी वडगाव आनंद गावच्या विकासात भर घालत रुपये दोन कोटी पन्नास लाखांच्या कामांची मुहूर्तमेढ रोवली. यावेळी ते बोलत होते. विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार बेनके म्हणाले, आजपर्यंत जुन्नर तालुक्याने बेनके कुटुंबावर प्रामाणिक प्रेम केलं त्याचप्रमाणे मी देखील आपणा सर्वांवर विकासरुपी प्रेम करत राहणार आहे. लोकसभा निवडणुका असल्या तरी यानंतर मी आपल्या गावासाठी पुढील पन्नास लाखाहून अधिकचा निधी देणार आहे. आळेफाटा व वडगाव आनंद येथील गटर कामाचे नियोजन देखील करण्याबाबत सूचित केले आहे. या कामासाठी गावच्या नागरिकांनी तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यात सरपंच रेलिका जाधव, उपसरपंच ऋषी गडगे, सदस्य गणेश भुजबळ, प्रफुल इथापे, संतोष पादीर, संदीप गडगे, गोरख देवकर, सोमनाथ गडगे, तसेच सदस्या वंदना शिंदे, वैशाली देवकर, अल्पना देवकर, कल्पना पादीर, निशा वाळूंज, शोभा शिंदे, अर्चना काशिकेदार, अश्विनी चौगुले यांचा समोवश आहे. यावेळी नवनाथ वाळुंज, संदेश काशीकेदार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन प्रमोद गडगे, विशाल गडगे, निमेश वाळुंज, जयराम भुजबळ, संदेश शिंदे, योगेश कुटे, विकास गडगे, सुरेश शिंदे, रामा चौगुले, जुन्नर तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष अंबादास हांडे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांसाठी निधी वडगाव आनंद येथील मोक्षधाम मंदिर ते उंबरपट्टा 10 लाख, गावठाण परिसर काँक्रिटीकरण 10 लाख रुपये, वडगाव आनंद स्मशानभूमी सुशोभीकरण 10 लाख रुपये, स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण 10 लाख रुपये, ग्रामपंचायत परिसर सुधारणा करणे 10 लाख रुपये, ग्रेप्स हॉटेल ते चौगुले वस्ती 10 लाख रुपये, ग्रामा 61 ते पादिरवाडी कळमजाई रस्ता 20 लाख रुपये, वडगाव आनंद एन. एच 222 ते कोकाटे रस्ता दहा लाख रुपये, बोटवाट रस्ता पंधरा लाख रुपये, चौरेमळा साकव 35 लाख रुपये, आडवा बोट मार्ग 50 लाख रुपये, कमलामाता मंदिर रोड 20 लाख रुपये, शिंदे हॉस्पिटल ते बेंदमळा 10 लाख रुपये तसेच नगर कल्याण महामार्ग ते नगारी ठाकरवाडी शिवेचा रस्ता 30 लाख रुपये.