Alankar Agnihotri : UGC नियमांविरुद्ध राजीनामा दिल्याने दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री निलंबित; प्रशासनाकडून ओलीस ठेवल्याचा केला होता आरोप
Alankar Agnihotri : यूजीसी नियमांच्या विरोधात राजीनामा देणारे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांच्यावर योगी सरकारने कारवाई केली आहे.

Alankar Agnihotri : यूजीसी नियमांच्या विरोधात राजीनामा देणारे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील शहर दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांच्यावर योगी सरकारने कारवाई केली आहे. अलंकार यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बरेली विभागीय आयुक्तांना तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अलंकार यांना तपास पूर्ण होईपर्यंत शामली जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात जोडण्यात आले आहे.
अविनाश सिंह यांच्यावर ओलीस ठेवण्याचे आरोप
अलंकार अग्निहोत्री यांनी शहर दंडाधिकारी पदाचा राजीनामा जाहीर केल्यापासून ते चर्चेत आहेत. त्यांनी बरेलीचे डीएम अविनाश सिंह यांच्यावर त्यांना त्यांच्या घरी बोलावून ओलीस ठेवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. अविनाश सिंह यांनी फेटाळले हे सर्व आरोप अलंकार यांना उत्तर दिले आहे.
अविनाश सिंह यांनी,”हे आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्यांना त्यांच्या घरी बोलावून ओलीस ठेवण्याचा काहीही अर्थ नाही ते स्वतःच्या गोष्टी रंगवून सांगत आहेत.”
हेही वाचा : UGC New Rules: भाजप पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; काय आहे UGC च्या नव्या नियमांचा वाद ? जाणून घ्या…
अलंकार अग्निहोत्री यांनी आरोपांबद्दल काय म्हटले?
अलंकार अग्निहोत्री यांनी अविनाश सिंह यांच्यावर आरोप करताना, “अविनाश सिंह यांनी त्यांना चर्चेसाठी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी बोलावले होते, ज्याठिकाणी त्यांना सुमारे ४५ मिनिटे ओलीस ठेवण्यात आले होते.
ओलीस ठेवण्यात आल्याचे जाणवत असल्याने त्यांनी सचिवांना फोन करून माहिती दिली, परंतु संभाव्य संघर्षाच्या भीतीने त्यांना तातडीने सोडण्यात आले आणि घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यांना रात्रभर ओलीस ठेवण्याची योजना होती.
अलंकार यांच्या आरोपांवर अविनाश यांची प्रतिक्रिया
अविनाश सिंह यांनी अलंकार अग्निहोत्री यांचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की अलंकार यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते, परंतु संभाषण सामान्य, सौहार्दपूर्ण वातावरणात झाले.
त्यांना कॉफी देण्यात आली, त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करण्यात आले आणि त्यांच्या राजीनाम्याचे कारणही विचारण्यात आले. ते ओलीस ठेवल्याची गोष्ट रचत आहेत.असे त्यांनी म्हटले.
अविनाश अग्निहोत्री यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी प्रयागराज माघ मेळ्यात स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा अपमान आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे आणि असे कृत्य सहन केले जाणार नाही असेही म्हटले आहे.






