प्रभात वृत्तसेवा आळंदी – आळंदीमधील कचरा डेपोला पुन्हा आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य दिसत आहे. अश्या अवस्थेतच मोकाट जनावरे कचरा खात असल्याचे दिसून येत आहे. खत निर्मिती साठी असलेल्या ठिकाणी प्लास्टिक गोण्या व इतर कचरा टाकला जात आहे.डेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच मध्यभाग व इतर ठिकाणचा कचरा जळालेल्या अवस्थेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून डेपो दुरावस्थेत असून त्याकडे दुर्लक्ष असल्याने कचरा डेपोस आग लागली आहे. अग्निशमन दलाचे आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.असे स्थानिक नागरिकाने सांगितले.कचरा डेपोचे आग सत्र सुरूच असून या वर्षी एप्रिल ते डिसेंबर पर्यंत डेपोस अनेक वेळा आग लागली. नगरपरिषदेने येथे पुन्हा आग लागू नये, तेथील हालचाली व देखरेखी साठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे. २४ तास सुरक्षा रक्षक नेमणे, कचरा डेपोमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची माहिती ठेवणे. मोकाट जनावरे आत जाऊ नये यासाठी उपाय योजना करणे, यासह विविध मागण्या नागरिकांनी केल्या आहेत