Alandi kartiki wari 2023: जालन्यातील शेतकरी दाम्पत्याला मिळाला माउलींच्या महापुजेचा मान

Alandi kartiki wari 2023: तीर्थक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे. आज कार्तिकी एकादशीनिमित्त ( kartiki ekadashi ) श्री माउलींच्या महापुजेचा मान जालना जिल्ह्यातील परतवाडी गावातील शेषेराव सोपान आडे आणि गंगुबाई शेषेराव आडे या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. पहाटे 2 वाजता महापूजा संपन्न झाली. दर्शनबारीत उभे असलेल्या पहिल्या दाम्पत्याला मान देण्याची परंपरा आहे. दोन वर्ष आधी देखील आडे यांना हा मान मिळाला होता. ( Alandi )
सर्व जगाला सुखी ठेव, पाऊस पाणी चांगले पडू दे असे मागणे आडे दाम्पत्याने माऊलींकडे मागितले. आज (दि. 9) कार्तिकी एकादशी वारीसाठी लाखो भाविक वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. सोमवारी (दि. 11) श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे.
आळंदीत सर्वत्र हरीनामाचा गजर
कार्तिकी वारी आणि माउलींच्या समाधी सोहळ्यासाठी देश – राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आळंदीत पोहोचले आहेत. आळंदी पंचक्रोशीत ठिकठिकाणी हरीनामाचा गजर सुरु आहे. आळंदीतील रस्ते भाविकांनी तुडुंब भरले असून अलोट गर्दी आहे.





