अक्षय शिंदेवर गोळी चालवणारा पोलीस ऑफीसर कोण ? एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मासोबत केलं आहे,’काम’

Akshay Shinde । बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने सोमवारी (२३ सप्टेंबर) पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली आहे. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या चकमकीत पोलीस निरीक्षक निलेश मोरे जखमी झाले आहे. ही घटना घडली तेव्हा शिंदे याला पोलीस कोठडीत घेण्यात आले होते.
मिळलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या रीवॉरल्व्हरचा वापर करून गोळीबार केला. यावेळी पोलिसांकडून प्रतिउत्तर देत फायरिंग करण्यात आली. यामध्ये अक्षय शिंदे ठार झाला. आता अक्षय शिंदेवर गोळीबार करणारा पोलीस ऑफिसर संजय शिंदे कोण होता अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
नेमकं काय घडलं…
समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे क्राईम ब्राँच युनिट 1 मध्ये अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल होता. बदलापूर बलात्कार प्रकरणात एसआयटीकडून चौकशी सुरू होती. त्याला कोठडीही देण्यात आली होती. त्यामुळे त्याला तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. मात्र, आणखी एका गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यासाठी बदलापूर पोलीस सोमवारी तळोजा येथे आले होते. सोमवारी सकाळी 5.30 वाजता पोलीस तळोजा कारागृहात पोहोचले होते. अक्षयचा ताबा घेऊन त्याला बदलापूरकडे नेत असताना ठाण्याच्या हद्दीत अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर सेल्फ डिफेन्ससाठी गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला
कोण आहेत संजय शिंदे ?
संजय शिंदे विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबतही त्यांनी काम केलंय. 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झालेले प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हून अधिक गुन्हेगारांचा सामना केला आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संजय शिंदे यांचाही समावेश होता.
संजय शिंदे यांच्या कारकिर्दीतील वाद
संजय शिंदे यांच्या कारकिर्दीत अनेक वाद झाले. खुनाचा आरोप असलेला विजय पालांडे हा पोलीस चौकशीदरम्यान पोलीस कोठडूतन पळून गेला होता, त्याला मदत करण्याचा आरोपही संजय शिंदेंवर लावण्यात आला होता. पालांडेच्या गाडीत शिंदे यांचा गणवेशही सापडला होता. त्यानंतर 2014 मध्ये मुंबई पोलिसांनी संजय शिंदे यांना पुन्हा कामावर घेतले.





