‘दोन्ही हातात बेड्या असताना…’ अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे पोलिसांनाच विचारला जाब

Akshay Shinde Encounter । बदलापुरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधात महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारसह पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.
सुषमा अंधारे आज पत्रकार परिषदेत म्हणाल्या,’ या प्रकरणात पोलिसांकडून सुरुवातीपासून तपास संथ गतीने सुरु होता. अशात आता सोमवारी झालेल्या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अक्षय शिंदे याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु कायद्याची प्रक्रिया बायपास होता कामा नये. मात्र पहिल्या दिवसापासून पोलिसांनी हलगर्जीपणा केला. प्रकरणाच्या सुरुवातीला पोलिसांनी चार्जशीट रविवारी का फाईल केली? ज्या पिस्तूलाने अक्षयने गोळी झाडली गेली ती पिस्तूल अनलोडेड असते. दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस उठून, पोलिसाच्या होस्टरमध्ये ठेवलेलं पिस्तुल खेचून गोळीबार कसा करू शकतो?’ याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे. असेही ते म्हणाले आहे.
हे एन्काऊंटर होतं की हत्या असा सवाल विचारत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांचा भडिमार करत या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला आहे. त्या पुढे म्हणाल्या, संजय शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला पाहिजे. या प्रकरणाची न्यायधिषांच्या समिती कडून चौकशी व्हायला पाहिजे. ठाण्यातून जे सत्ता केंद्र चालते त्याबद्दल आम्हाला विश्वास नाही २४ तासात घटनेची माहिती मानवाधिकार यांना दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
त्या पुढे बोलतांना म्हणाल्या,’या घटनेत फेक एन्काऊंटर ची स्क्रिप्ट तयार करण्यात आली आहे. मी प्रश्न उपस्थितीत केला आहे, मग फडणवीस यांनी काय केलं पाहिजे ९ एम एम चे पिस्तूल सामान्य माणसाला त्याचं लॉक उघडता येत नाही. एस आय टी स्थापन करणे म्हणजे थट्टा आहे. माझीच बॅट, माझाच बॉल असं झालं.’ असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
==============





