अक्षय शिंदेच्या वकिलांची शिंदे गटाच्या ‘या’ बड्या नेत्यांना नोटीस ; फॉरेन्सिक रिपोर्ट उघड केल्याचा आरोप

Akshay Shinde Encounter । बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वकिलांनी शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि योगेश कदम यांना नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अक्षय शिंदे संदर्भात केलेली वक्तव्य, तसेच फॉरेन्सिक अहवाल जाहीर केल्याचा आरोप करत ही नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे. या नोटीसला दोन दिवसांत उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारादेखील या दोन्ही नेत्यांना देण्यात आला आहे.
फॉरेन्सिक रिपोर्ट उघड केल्याचा आरोप Akshay Shinde Encounter ।
शिंदे गटाच्या नेत्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेल्याचा फॉरेन्सिक अहवाल योगेश कदम यांनी जाहीर केल्याने गोपनीयतेचा भंग केल्याचा दावा करण्यात आला आहे. तर संजय शिरसाट हे अक्षय शिंदेला सातत्याने नराधम म्हणत असल्याबद्दल अक्षय शिंदे याच्या वकिलांचा आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते या नोटीसला काय उत्तर देणार, हे पाहणे गरजेचे आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. या एन्काऊंटरच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. यामध्ये एकंदरित घटनाक्रमाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अक्षय शिंदे याला नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून बदलापूरच्या दिशेने नेताना मुंब्रा बायपासवर ही चकमक झाली होती.
अक्षय शिंदे याने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली आणि गोळीबार केला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाहीत. पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले होते. या सगळ्यामुळे ही चकमक बनावट असून पोलिसांनी बळाचा गैरवापर करत अक्षय शिंदे याला मारल्याच्या दाव्याला बळकटी मिळाली होती.
अशा गुन्हेगाराला जिवंत राहण्याचा अधिकार नाही Akshay Shinde Encounter ।
विशाल गवळी या नराधमाने एका पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या पिडीत कुटुंबाच्या घरी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. हे सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे अशा कुटुंबावर मोठा आघात आहे. जो गुन्हेगार आहे गवळी आणि ही केस फास्टट्रॅक वर चालेल उज्वल निकम साहेबांसोबत मी स्वतः बोललोय. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करून काळीमा फासणारी घटना आहे. अशा गुन्हेगाराला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. शासनाच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून न्यायालयाकडे अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी तसा प्रयत्न शंभर टक्के होणार पुरावे आणि पोलिसांनी जो तपास केलाय जे पुरावे गोळा केले आहेत. ते पुरावे त्याला फाशीवर लटकवल्याशिवाय राहणार नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.





