‘बच्चन पांडे’ चित्रपटासाठी प्रमोशनचा अक्षय कुमारचा हटके फंडा

Updated On:

मुंबई – एखाद्या नवीन चित्रपटाविषयी आपल्या मनात उत्सुकता कशी निर्माण होते?  त्याच कारण म्हणजे चित्रपटांचं प्रमोशन.. या न त्या रुपाने आपल्यासमोर सतत त्या चित्रपटाविषयी काही ना काही येत असल्याकारणाने देखील आपल्या मनात त्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होते. सध्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी ट्रेलर लाँच, कलाकारांच्या मुलाखती या पद्धतीने तर प्रमोशन केलंच जातं. मात्र, चित्रपटाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्पर्धा घेत चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

यातच सुपरस्टार अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ऍक्शन कॉमेडी चित्रपट ‘बच्चन पांडे’ 18 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षयने हटके फंडा वापरला आहे.

इंस्टाग्रामवर अक्षयने कुमारने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय फोनवर एका मुलीसोबत खास गप्पा मारताना दिसत आहे. दिप्ती असं या मुलीचं नाव आहे. चित्रपटाचं प्रमोशन करण्याची अक्षयची ही हटके पद्धत नेटकऱ्यांच्या पसंतीस पडली.

यामध्ये अक्षय सोलापूरमधील दिप्तीला फोन करतो. दिप्तीनं अक्षयला सांगितलं की ती सोलापूरची आहे. मग अक्षयनं तिच्यासोबत मराठी भाषेत बोलायला सुरूवात केली,’शासकीय परीक्षेची तयारी करत आहे. हे ऐकल्यानंतर अक्षयनं दिप्लीला परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि परिक्षा झाल्यानंतर बच्चन पांडे चित्रपट पाहण्यास सांगितले. दोघांमधील या संवादाचा व्हिडीओ अक्षयनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा ! सोलापूरच्या मुली सोबत अक्षयच्या मराठीतील गप्पा

आणखी संबंधित बातम्या

Akshay Kumar : 'लवकर बरा हो मित्रा, आपल्याला अजून...;' मृत्यूशी झूंज देत असणाऱ्या अभिनेत्यासाठी अक्षयची भावूक पोस्ट

2026-07-10 08:17:04

Akshay Kumar : 'लवकर बरा हो मित्रा, आपल्याला अजून...;' मृत्यूशी झूंज देत असणाऱ्या अभिनेत्यासाठी अक्षयची भावूक पोस्ट

Top 10 News : मुंबईत पावसाचे थैमान ते CM विजय यांच्या अडचणीत वाढ...; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-07-06 18:03:28

Top 10 News : मुंबईत पावसाचे थैमान ते CM विजय यांच्या अडचणीत वाढ...; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Akshay Kumar : वजन कमी करायचंय? अक्षय कुमारने सांगितला सर्वात सोपा फॉर्म्युला; वाचा फिटनेस मंत्रा...

2026-06-22 17:03:07

Akshay Kumar : वजन कमी करायचंय? अक्षय कुमारने सांगितला सर्वात सोपा फॉर्म्युला; वाचा फिटनेस मंत्रा...

Raveena Tandon: रवीना टंडनलला 'मोहरा' चित्रपटाची आठवण; शेअर केला अक्षय कुमार-सुनील शेट्टीसोबत फोटो

2026-06-11 13:37:36

Raveena Tandon: रवीना टंडनलला 'मोहरा' चित्रपटाची आठवण; शेअर केला अक्षय कुमार-सुनील शेट्टीसोबत फोटो

Ucha Lamba Kad Forever : मिस यू कैटरीना.! 'उच्चा लंबा कद' रिलीज होताच प्रेमाचा वर्षाव; अक्षय-दिशाचा धमाकेदार डान्स !

2026-06-01 14:49:25

Ucha Lamba Kad Forever : मिस यू कैटरीना.! 'उच्चा लंबा कद' रिलीज होताच प्रेमाचा वर्षाव; अक्षय-दिशाचा धमाकेदार डान्स !