Aarav Kumar : अक्षय कुमारचा लेक आरव कुमारसोबत प्रसिद्ध अभिनेत्री परदेशात; फोटो पाहताच चाहते आवाक्
Aarav Kumar : आरव कुमार लाईमलाईटपासून दूर

Aarav Kumar : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमार सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतीच तिच्या सुट्ट्यांची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये अनन्यासोबत अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव भाटिया दिसून आला.
अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच तिने आरवसोबतची एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. यामध्ये दोघेही एकत्र बसून कॅमेऱ्याला पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये अनन्या आणि आरव मफिन खास असलेले पाहायला मिळाले. हा फोटो शेअर करत अनन्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “मित्रांनो, माझ्या बेकिंगला मंजुरी मिळाली आहे.” आरव कुमार लाईमलाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, असे असताना अनन्यासोबत आरवची परदेशात वेकेशनची एक झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली.
आरव आणि अनन्याचा हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी असा अंदाज लावत आहेत की अनन्या, अक्षय कुमारच्या मुलाला डेट करत आहे. मात्र, या केवळ अफवा आहेत. आरव-अनन्या दोघेही चांगले मित्र आहे. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही असं समोर आले आहे.
आरव कधीकधी आपल्या कुटुंबासोबत सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसून येतो, परंतु सामान्यतः सेलिब्रिटींच्या बातम्यांपासून दूर राहतो आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी सोशल मीडियावरही खूप कमी शेअर करतो. अशा परिस्थितीत तो अनन्या पांडेसोबत दिसल्यामुळे चाहत्यांचे लक्ष याकडे वेधले गेले आहे.
आरव सध्या फॅशन डिझायनिंगमध्ये त्याचे शिक्षण घेत आहे. तर अनन्या पांडेबद्दल सांगायचं तर, अनन्याने २०१९ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती लवकरच अक्षय कुमारसोबत ‘शंकरा’ नावाच्या एका चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा:
Rahul Gandhi : सणासुदीला १० हजार कोटींचे नुकसान? दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना आवाहन


