Sarfira Trailer : अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘सरफिरा’चा ट्रेलर रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारच्या सरफिरा या चित्रपटाचा ट्रेलर (Sarfira Trailer) नुकताच रिलीज झाला आहे. इमोशन्स आणि प्रेरणादायी कथानकाने प्रेरित असलेल्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
अक्षय कुमारने शेअर केला ट्रेलर
“स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत, अशीच एक स्वप्न कथा आहे सरफिरा, सरफिरा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज” असं कॅप्शन देत अक्षय कुमारने हा ट्रेलर शेअर केला आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
चित्रपटाचे कथानक स्टार्ट अप बिझनेस आणि एअरलाईनवर आधारित आहे. जर तुमच्याकडे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर तुम्ही ते कशा प्रकारे पूर्ण करू शकता हे आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल.
‘या’ कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका
‘सरफिरा’ मध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमारसह परेश रावल, राधिका मदन, आर. सरथ कुमार आणि सीमा बिस्वास हे कलाकार आहेत. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री इरावती हर्षे ही मुख्य भूमिकेत आहेत. ‘ओएमजी’ नंतर अक्षय कुमार आणि परेश रावल पुन्हा एकदा या चित्रपटातून एकत्र झळकणार आहे. हि जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होते का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हा चित्रपट 12 जुलैला रिलीज होणार आहे.





