अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण; शेअर केला खास व्हिडिओ

Akshay Kumar | बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी हॉरर-कॉमेडी ‘भूत बंगला’ या सिनेमाची अपडेट समोर आली आहे. अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये तो एका गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहे. यातील त्याचा अनोखा अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
अक्षय कुमारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो अभिनेत्री वामिका गब्बीसोबत नाचताना दिसत आहे. अभिनेता धबधब्याखाली हिरव्या रंगाच्या शर्टसह हलक्या तपकिरी रंगाची पँट आणि गोल टोपी अशा लुकमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत वामिका गब्बी दिसत आहे. तिने आकाशी निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसते. हा व्हिडीओ अक्षय कुमारच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’मधील आहे. अक्षयने चित्रपटाचा बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे.
सोबतच त्याने व्हिडिओला कॅप्शन देत, ‘भूत बंगला चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. प्रियदर्शन सरांबरोबरचा हा माझा सातवा चित्रपट, कधीही न संपणारा एकता कपूरबरोबरचा माझा दुसरा प्रवास. तसेच वामिका गब्बीबरोबरचा माझा पहिला, पण आशा आहे की शेवटचा नाही, जादुई प्रवास. वेडेपणा आणि अद्भुत आठवणींसाठी आभारी आहे,’ असे लिहिले आहे. Akshay Kumar |
View this post on Instagram
या चित्रपटात अक्षय कुमार वामिका गब्बी व्यतिरिक्त असरानी, जिशु सेनगुप्ता, परेश रावल, राजपाल यादव आणि तब्बू असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहे. तर बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली शोभा कपूर आणि एकता आर कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. Akshay Kumar |
हेही वाचा:
युट्यूबर ज्योती मल्होत्राचा चीनशी नेमका काय संबंध? ; पोलिस म्हणाले,”आम्ही लवकरच…’





