अक्षय कुमारचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ OTTवर होणार रिलीज

Bade Miyan Chote Miyan | अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट ईदच्या दिवशी रिलीज झाला. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी करू शकला नाही. चित्रपटगृहानंतर आता हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जूनमध्ये OTT वर रिलीज होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानुसार आता हा चित्रपट 6 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
बडे मियाँ छोटे मियाँ हा सिनेमा 2024 च्या ईदच्या खास मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या जोडीने निश्चितच कमाल केली. या चर्चेदरम्यान, लोक या चित्रपटाच्या ओटीटीवर प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, बडे मियाँ छोटे मियाँ 6 जून 2024 पासून Netflix India वर स्ट्रीम केला जाईल. तथापि, भाषांबाबत कोणतेही अपडेट आलेले नाहीत. यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, अलाया एफ, सोनाक्षी सिन्हा आणि रोनित रॉय महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
बडे मियाँ छोटे मियाँच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर, अक्षय आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन, रोनित रॉय आणि मानुषी छिल्लर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे बजेट 350 कोटी रुपये होते आणि 100 कोटी रुपयेही कमावले नव्हते.





