रहस्य,थरार आणि शोध ! अक्षय कुमारने शेअर केला ‘राम सेतू’चा जबरदस्त टीजर

मुंबई – अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘राम सेतू’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अक्षयने स्वतः राम सेतूचा टीजर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीजर पाहून जबरदस्त ऍक्शन आणि शोध मोहीम असलेल्या ‘राम सेतू’ या चित्रपटाबाबतची उत्कंठा आणखी वाढली आहे.
चित्रपटात अक्षय त्याच्या टीमसह राम सेतू वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासोबतच टीजरमध्ये धमाकेदार अॅक्शन सीनही पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे अक्षय पुन्हा एकदा जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. टीझरमध्ये खऱ्या राम सेतूचे दृश्यही दाखवण्यात आले आहे.सोशल मीडियावर टीजर शेअर करताना अक्षयने लिहिले, “राम सेतूची पहिली झलक…फक्त तुमच्यासाठी. अंगावर शहारे आणणारे राम..राम म्यूजिक अप्रतिम वाटत आहे.
View this post on Instagram
अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा आणि सत्य देव हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘राम सेतू’ हा या वर्षातील बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. 25 ऑक्टोबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात ‘राम सेतू’प्रदर्शित होणार आहे.





