अक्षयने ट्विंकलला दिल्या खास शुभेच्छा, रोमँटिक फोटो केला शेअर

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना आज तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने पत्नीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना सध्या मालदीवमध्ये असून ट्विंकल तिचा वाढदिवस अक्षय आणि मुलगी नितारासोबत मालदीवमध्ये साजरा करत आहे. पत्नी ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त एक रोमँटिक फोटो शेअर करत अक्षय कुमारने ट्विंकल खन्ना हिच्यासाठी एक खास पोस्ट देखील लिहिली आहे. त्यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंटही केल्या आहेत.
With you by my side, even the blues are easy to take in my stride… Happy birthday Tina 😘 pic.twitter.com/7Foo6eWsR8
— Akshay Kumar (@akshaykumar) December 29, 2021
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे खास बॉन्ड शेअर करतात. आता त्याने ट्विंकल खन्नाचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी एका खास पद्धतीने पोस्ट केली आहे. अक्षयने पत्नी ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त मालदीवमधील एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ”तू माझ्यासोबत आहेस, अगदी ब्लूजही माझ्या वाटचालीत सहजतेने सामील आहेत…वाढदिवसाच्या शुभेच्छा…टिना.





