Akshay Kumar : अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Akshay Kumar : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार लवकरच ‘भूत बंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाची मांजर कॅलेंडरवरील एका तारखेवर नखाने क्रॉस करते, त्यावर दूध सांडते आणि त्यानंतर एक नवी तारीख समोर येते. ‘भूत बंगला’ १० एप्रिल २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
आधी काय होती रिलीज डेट?
आधी हा चित्रपट 15 मे 2026 रोजी रिलीज होणार होता, मात्र आता तो त्याआधीच मोठ्या पडद्यावर येणार आहे. अक्षय कुमारच्या यावर्षी येणाऱ्या सर्व चित्रपटांच्या शेड्यूलनुसारच ही नवी तारीख ठरवण्यात आली आहे. Akshay Kumar
विशेष म्हणजे हा चित्रपट सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ आधी रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी अक्षय कुमार आधीच आपली मजबूत पकड तयार करू शकतो. दरम्यान, ‘भूत बंगला’च्या नव्या रिलीज डेटमुळे अक्षय कुमारचे चाहते अधिकच उत्साहित झाले आहे. Akshay Kumar
हेही वाचा:





