अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘हृदय आणि नागरिकत्व, दोन्ही भारतीय’

मुंबई – अभिनेता अक्षय कुमार आता भारतीय नागरिक झाला आहे. त्याने या बाबत सोशल मीडियावर अधिकृत कागदपत्रे शेअर केली आहे. डॉक्युमेंटचा फोटो शेअर करून त्याने चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
अक्षयकडे यापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व होते, त्यामुळे त्याला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले होते. अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसेच चाहत्यांना सांगितले की तो भारतीय नागरिक झाला आहे. फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले,’हृदय आणि नागरिकत्व, दोघेही भारतीय आहे. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा...जय हिंद.’
अक्षय कुमारच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहे. एका यूजरने लिहिले,’सर, तुम्ही द्वेष करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा… !’ असं म्हणत आता सोशल मीडियावर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. OMG 2 मध्ये अक्षयसोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसले आहे. हा चित्रपट एका संवेदनशील विषयावर बनवला गेला.
OMG 2 नंतर अक्षय लवकरच सोराई पोत्रूच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत राधिका मदन आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.





