#Video : खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अक्षय बोऱ्हाडेला अटक

Updated On:
#Video : खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अक्षय बोऱ्हाडेला अटक

जुन्नर (वार्ताहर) – जुन्नर येथील गॅस वितरकाला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिलेप्रकरणी शिरोली बुद्रुक येथील अक्षय मोहन बोऱ्हाडे ( Akshay Borhade arrest ) याला जुन्नर पोलिसांकडून मंगळवार रात्री उशिरा अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार बोऱ्हाडे ( Akshay Borhade arrest ) याने जुन्नर मधील एच.पी. गॅस वितरक रूपेश प्राणलाल शहा यांचे नागरी वस्तीत गॅस सिलिंडरचे गोदाम असलेबाबत जुन्नर तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून माहीती अधिकारात माहीती मागविली होती.

तसेच शहा यांना फोन करून पैशांची मागणी केली. माझी माणसे पाठविली आहेत, त्यांचेकडे पैसे दे, त्याचप्रमाणे वेळोवेळी माझ्या संस्थेत येणारा खर्च तुला करावा लागेल, नाहीतर मी तुझ्या विरोधात फेसबुक लाईव्ह करून तुझा व्यवसाय कसा चालतो तेच बघतो अशी धमकी दिली होती. ( Akshay Borhade arrest )

रूपेश शहा यांनी आरोपीस प्रतिसाद न दिल्याने आरोपीने पुन्हा जुन २०२१ मध्ये फोन करून पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. खंडणी मागितल्या प्रकरणी अक्षय मोहन बोऱ्हाडे याचेवर गुन्हा दाखल करून जुन्नर पोलिसांनी अटक केली व बुधवार रोजी प्रथम वर्ग मा.जुन्नर न्यायालयात आरोपीस हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहीती पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी दिली.

वरील गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील हे करीत आहे. तरी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरीकांनी खंडणी मागणी सारखे प्रकार होत असतील किंवा निदर्शनास आल्यास त्याबाबत निर्भयपणे पोलिसांत तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

त्याप्रमाणे अक्षय मोहन बोऱ्हाडे याने जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे तसेच स्थानिक सर्वच पक्षांच्या नेत्यांविषयी फेसबुक लाईव्हद्धारे आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत शिवसेना उपतालुका प्रमुख अविनाश करडीले, शहर प्रमुख चंद्रकांत डोके तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकारी यांनी बोऱ्हाडे याचे विरूद्ध कारवाई करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

2026-10-04 22:20:05

Punjab News : पंजाबमधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त

Mad Sandhu: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला गोळ्या घालून संपवलं; गँगस्टर गोल्डी ढिल्लनने घेतली हत्त्येची जबाबदारी

2026-10-04 14:41:01

Mad Sandhu: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला गोळ्या घालून संपवलं; गँगस्टर गोल्डी ढिल्लनने घेतली हत्त्येची जबाबदारी