अक्कलकोट : भरधाव कारची झाडाला जोरदार टक्कर; देवदर्शासाठी गेलेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू
Updated On:

अक्कलकोट – चालकाचा कारवरून ताबा सुटून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भयानक अपघात सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट-गाणगापूर रोडवर घडला आहे. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. अपघातग्रस्त अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी आले असल्याचे प्राथमिक माहितून समोर आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. या पाचही जणांचा मृतदेह कर्नाटकातील अफझलपूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला आहे. मृतांच्या कुटुंबाबात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
गाणगापूरहून परत अहमदनगरला परतत असताना चालकाचा गाडीवरून ताबा सुटला, ज्यामुळे त्यांच्या भरधाव कारने झाडाला जोरदार टक्कर दिली. ही टक्कर इतकी भयानक होती की, कारमधील पाचही लोकांचा जागीच मृत्यू झाला.





