Jaya Bachchan : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जया बच्चन त्यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे सतत चर्चेत असतात. सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांना कव्हरेज देण्याचे काम पापाराझी करत असतात. काही कलाकारांना ते आवडत तर काहींना आवडत नाही, परिणामी ते पॅपराझींवर चिडतात. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंंद्र यांच्या निधनानंतर पापाराझींवर अभिनेता सनी देओल प्रचंड चिडला होता. त्याला कारणही तसेच होते. पण जया बच्चन यांनी तर हद्दच केली असून, त्यांनी पापाराझींना एका कार्यक्रमात बोलताना उंदीर, घाणेरडी पँट घालणारे असे संबोधले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर पापाराझींनी नाराजी व्यक्त करत अख्या बच्चन कुटुंबाला बॅायकॅाट करण्याचा निर्णय घेतला आहे. पापाराझींना अशा शब्दांत संबोधल्याने त्यांनी देखील जया बच्चन यांना थेट शब्दांत उत्तर दिले आहे. दर रविवारी जेव्हा अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना भेटतात, त्यावेळी आम्हीच त्यांचं कव्हरेज करतो. तसेच, जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाच्या आगामी चित्रपट ‘इक्कीस’ सिनेमाचे कव्हरेज कोण देईल? असा प्रश्न पापाराझींनी जया बच्चन यांना विचारला आहे. जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, काहींनी सपोर्ट तर काहींनी अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर प्रमुख पॅपाराझींनी त्यांची मतंही व्यक्त केली आहेत. नेमकं काय म्हणाल्या जया बच्चन? “मी मीडियाचं प्रोडक्ट आहे. माझे वडील पत्रकार होते. पण हे पॅपराझी कोण आहेत? कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, नालीतल्या पाईपसारखे टाइट, घाणेरड्या पॅन्ट्स घालून, हातात मोबाइल घेऊन फिरतात आणि फोटो काढतात. हे मीडिया कसे? त्यांचं एज्युकेशन काय? बॅकग्राऊंड काय?” अशा शब्दांत पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना जया बच्चन यांनी पापाराझींवर टीका केली होती. यानंतर आता सोशल मीडियावर पापाराझींकडून जया बच्चन आणि त्यांच्या अख्या बच्चन कुटुंबाला बॅायकॅाट करण्याचा सूर दिसून येत आहे. प्रसिद्ध पॅप मानव मंगलानी म्हणाले, “जया मॅडमचा मी खूप आदर करतो. पण त्यांनी डिजिटल मीडिया समजून घ्यायला हवा. काही युट्यूबर्स आणि कंटेंट क्रिएटर्समुळे अव्यवस्था निर्माण झाली आहे. पण ते पॅपराझी नाहीत. सर्वांना एकत्र हिणवणं योग्य नाही.” पापाराझी कॅल्चर बॅालिवूडमध्ये रुढ झाले आहे. पण जया बच्चन यांचे पापाराझींसोबत अनेकदा खटके उडाली असून, वाद घातल्यायचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्यांनी थेट पापाराझींना हिणवणारे आणि अतिशय तुच्छ भाषेतील शब्द वापरल्याने पॅप्स चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे आता बॅायकॅाटच्या निर्णयामुळे सगळ्या बच्चन कुटुंबाला त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी फटका बसणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : “…तर तुम्हाला अन्न आणि पाणी मिळणार नाही” ; मध्यप्रदेशच्या मंत्र्यांच्या विधानाने गोंधळ