Pune Gramin : कवठे येमाई येथे दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात

शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठेयेमाई येथे सालाबादप्रमाणे दत्तजयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जयंती महोत्सवाचे हे ५१ वे वर्ष आहे. अखंड हरिनाम सप्ताहात काकडा भजन, विनानामस्मरण, गुरुचरित्र पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, अभंग वाणी, संगीत भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, महाप्रसाद अन्नदान, हरी जागर, कीर्तन, या दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ रोजी ह.भ.प. अमेय महाराज शिंदे, २९ रोजी शशिकांत महाराज राऊत, ३० रोजी ह.भ.प. ऋषिकेश महाराज चोरघे, १ डिसेंबर रोजी ह.भ.प.सुनिल महाराज झांबरे, २ रोजी ह.भ.प. गणेश महाराज जगताप, ३ रोजी ह.भ.प.सुधाकर महाराज मुळे शास्त्री, ४ रोजी ह.भ.प.भरत महाराज थोरात (श्री दत्त जन्म कीर्तन ४ ते ६) व मंगेश महाराज शिंदे यांचे कीर्तने ७ ते ९ या वेळेत होतील.
याच दिवशी वैदिक पद्धतीने होम हवन होणार असून यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ५ रोजी विनोदाचार्य आदिनाथ महाराज लाड (सकाळी ९.३० ते ११.३०) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कवठेयेमाई ग्रामस्थ व श्री दत्त जयंती उत्सव समिती प्रयत्नशील आहेत.
श्री दत्त जयंती भक्त महिमा व त्यायोगे समाज परिवर्तन होऊन सदभाव, भक्तीभाव वाढीस लागावा या उदात्त हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून लाखोंच्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहून ज्ञानदानाचा व श्रवण सुखाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. दत्त जन्म उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ कवठे यांनी केले आहे.




