राजस्थानमधील भीषण आगीत ४ जणांचा होरपळून जळून मृत्यू ; महिलेने मुलाला वाचवण्यासाठी फेकले खिडकीतून खाली

Ajmer Fire । राजस्थानमधील अजमेरमधील दिग्गी बाजारमध्ये नाझ हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर एका मुलासह पाच जण जखमी झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली, त्यामुळे उपस्थितांमध्ये घबराट पसरली. अरुंद रस्त्यांमुळे बचाव कार्यात अडथळा येत होता, परंतु अग्निशमन दल आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
जेएलएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल सामरियायांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी,”आज सकाळी दिग्गी बाजार परिसरातील एका हॉटेलमध्ये आग लागली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. गुदमरून आणि जळून दोन पुरुष, एक महिला आणि एका मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.” असे म्हटले.
#WATCH | Ajmer, Rajasthan | A colossal fire broke out at Hotel Naaz in the Diggi Bazaar of Ajmer. Fire tenders, an ambulance, and the police have reached the spot. Five people have been rescued, including one child. pic.twitter.com/Bj2OHVRZFd
— ANI (@ANI) May 1, 2025
अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिमांशू जांगिड म्हणाले, “हॉटेलकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. सुरुवातीला आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असे वाटत होते.” Ajmer Fire ।
आग लागल्यानंतर गोंधळ Ajmer Fire ।
अजमेरच्या नाझ हॉटेलमध्ये आग लागल्यानंतर हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली. लोक हॉटेल सोडून पळू लागले. दरम्यान, काही लोकांनी तर आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खोलीतून उड्या मारल्या. दरम्यान, अरुंद रस्त्यांमुळे बचाव कार्यात अडथळा येत होता. अजमेर अग्निशमन दल आणि पोलिस आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.





