Ajit Pawar: “ज्या माणसाने आयुष्याचा प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि फाईल्सचा निपटारा करण्यासाठी वेचला, तो आवाज आज शांत झाला”

Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा लॅंडिंगदरम्यान भीषण अपघात झाला.
त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या पाच जणांचा देखील मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या अचानक एक्झिटने अनेकांना अश्रु अनावर झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय नेतेमंडळींनी अजित पवारांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
अमोल कोल्हे यांची पोस्ट
अमोल कोल्हे यांनी देखील पोस्ट शेअर करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. “महाराष्ट्राच्या विकासपुरुषास भावपूर्ण श्रद्धांजली..! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्याचे लाडके आणि हक्काचे दादा मा. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. खरंतर अजूनही विश्वास बसत नाही की अजित दादा आता आपल्यात नाहीत.
महाराष्ट्राच्या विकासपुरुषास भावपूर्ण श्रद्धांजली..!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्याचे लाडके आणि हक्काचे दादा मा. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. खरतर अजूनही विश्वास बसत नाही की अजित दादा आता आपल्यात नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राने आज… pic.twitter.com/Q8utX1sBrd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) January 28, 2026
संपूर्ण महाराष्ट्राने आज एक उत्तम प्रशासक, शिस्तशील नेतृत्व आणि जनतेसाठी भल्या पहाटेपासूनच काम करणारा हक्काचा माणूस गमावला आहे. दादा तुमचे हे अकाली जाणे सर्वसामान्य जनतेलाही बिलकुल रुचले नाही.
आज फक्त बारामतीकरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक सर्वसामान्याच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि सोबतच पोरकेपणाची भावना आहे. ज्या माणसाने आयुष्याचा प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि फाईल्सचा निपटारा करण्यासाठी वेचला, तो आवाज आज शांत झाला, यावर विश्वासच बसत नाही.
दादांचा स्वभाव अनेकांना कडक वाटला असेल, पण त्या कडकपणामागे राज्याच्या हिताची कळकळ आणि कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा होता. राजकारणात शब्द बदलणारे खूप पाहिले, पण “दादांनी शब्द दिला म्हणजे काम होणारच” हा जनतेचा विश्वास आता कायमचा स्मृती बनला आहे.
मंत्रालयातील त्या रिकाम्या दालनस देखील अजित पवार यांच्यासारख्या कार्यशील व कर्तृत्व्वान नेतृत्वाची कायम उणीव भासेल. दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील..!”
हेही वाचा:





