Ajit Pawar : खोपोलीकरांचे डोळे पाणावले! लाडक्या ‘अजितदादांना’ सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे खोपोलीत सर्वपक्षीय शोकसभा; नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या पुढाकाराने दादांच्या आठवणींना उजाळा.
Updated On:

Ajit Pawar – कामाचा माणूस अशी ख्याती असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) अपघाती निधन झाले. आणि गुरुवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच दिवशी (दि. २९) संध्याकाळी पाच वाजता खोपोली शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडून दादांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत मतदार संघ अध्यक्ष अश्विनी पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, सुरेखा खेडकर, कॉग्रेसचे वरिष्ठ नेते उल्हासराव देशमुख, शिवसेनेचे जेष्ठ नेते मोहन औसरमल,
माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्यासह विविध पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या अशा अचानक जाण्याने दुःख व्यक्त केले. यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या पुढाकाराने हा सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.





