अरुणाचल प्रदेशमधील मोठ्या यशानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावलं…”

Ajit Pawar on Arunachal Pradesh Results| अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारीच 2 जून रोजी पार पडली. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. यामध्ये भाजपने तब्बल 46 जागा जिंकत मोठे यश मिळवले. तर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने देखील चांगली कामगिरी केली आहे. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 15 उमेदवार उभे होते. यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर काही उमेदवार अवघ्या काही फरकाने पराभूत झाले.
हा विजय ऐतिहासिक असून…
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पक्षाने मिळवलेलं हे पहिलंच राजकीय यश आहे. या यशानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उमेदवारांचं अभिनंदन केले आहे. “अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल
“विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या १०.०६ टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो,” असेही त्यांनी आश्वासन दिले. Ajit Pawar on Arunachal Pradesh Results|
पुढे ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावलं पुढे पडत आहेत आणि अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे. लोकशाहीची मुल्ये अंगीकारून आमचा पक्ष देशभर विकासाचे नवनवे आदर्श उभे करेल यात काही शंका नाही. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”
अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले… pic.twitter.com/8ccIeS6rlh
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 2, 2024
दरम्यान, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजप ४६, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) 5, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) 3 आमदार निवडून आले आहेत. तर राज्यात काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली. त्याचबरोबर राज्यातील एकूण तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. Ajit Pawar on Arunachal Pradesh Results|
तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) या सत्ताधारी पक्षाने राज्यातील ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या आहेत. केवळ एका जागेवर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा उमेदवार विजयी झाला आहे. Ajit Pawar on Arunachal Pradesh Results|
हेही वाचा:
Virat Kohli : रनमशीन कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ICC कडून मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार





