“सीसीटीव्ही फुटेजमधून बऱ्याच गोष्टी…” ; स्वारगेट प्रकरणावर अजित पवार यांचे महत्वाचे विधान

Ajit Pawar on Swargate Case । पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेऊन काल रात्री त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरुरमधून त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकाणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नांदेड येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केले. स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे म्हणत विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. त्याच टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या Ajit Pawar on Swargate Case ।
अजित पवार यांनी,”मी आज सकाळी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. मी त्यांना म्हटलं की स्वारगेटला जे काही झालं ते चुकीचंच आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनास्थळाच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. पोलीस चौकशीत आरोपीचा जबाब, इतर साक्षी-पुरावे पोलिसांकडे आहेत. आरोपीला कठोर शासन होईल. तसेच आपल्या राज्यातली प्रत्येक मुलीचं, बहिणीचं, महिलेचं संरक्षण व्हायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवलेल्या वाटेवर आपण चालायचं आहे.
माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांचा पक्षात प्रवेश Ajit Pawar on Swargate Case ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) नांदेडमधील कार्यक्रमात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याबाबत अजित पवार म्हणाले, मी मोहनराव यांच्यासह सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या प्रवेशामुळे नांदेडमध्ये पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे. पक्षाचं जनकल्याणाचं कार्य पुढे नेत असताना मोहनराव यांचा दांडगा जनसेवेचा अनुभव कामी येईल.





