Maharashtra Election : राष्ट्रवादीकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाची मागणी; कोणाला मिळणार संधी आणि कोणाचा होणार पत्ता कट?

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार मानले जात असताना एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असल्याचे आता स्पष्ट आहे. यादरम्यान आता अजित दादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी केल्याचे समोर आले आहे.
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
धनंजय मुंडे
अदिती तटकरे
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम
अजित पवार
छगन भुजबळ
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
देवेंद्र फडणवीस
गिरीश महाजन
रविंद्र चव्हाण
मंगलप्रभात लोढा
चंद्रशेखर बावनकुळे
आशिष शेलार
नितेश राणे
शिवेंद्रसिंहराजे भोसले
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
पंकजा मुंडे
गोपीचंद पडळकर
कोणाला डच्चू मिळण्याची शक्यता
विजयकुमार गावित
सुधीर मुनगंटीवार
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
संजय शिरसाट
भरत गोगावले
प्रकाश सुर्वे
प्रताप सरनाईक
तानाजी सावंत
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
निलेश राणे
कोणाला डच्चू मिळणार?
दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
संजय राठोड





