अजित पवार गटाच्या युवा पदाधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; विष प्राशन करत संपवलं जीवन, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Solapur News : सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ओंकार हजारे असे आत्महत्या केलेल्या तरून पदाधिकाऱ्याचे नाव असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर ते कार्यकर्त होते.
हजारे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या आत्महत्येचा कारण अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. हजारे यांच्या अकाली जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
ओंकार हजारे रविवारी रात्री आपल्या बेशुद्धा अवस्थेत एका गाडीत कुटुंबीयांना आढळून आले. कुटुंबीयांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. बेशुद्धा अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॅाक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या अकाली जाण्याने सगळ्यानांच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सोलापूर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ओंकार हजारे यांची आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समोर आले नसून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अण्णाच्या जाण्याने हळहळ व्यक्त
ओंकार हजारे यांचे २०१९ मध्ये लग्न झाले होते. त्याच्या जाण्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे कुटुंबात आई वडिल पत्नी भाऊ, भावजय असा परिवार आहे. सोलापूरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारे यांना सर्व अण्णा नावाने ओळखायचे. ते तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होते. सोलापूरात पक्षासाठी संघटनात्मक बांधणीत त्यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले जात आहे. ओंकार हजारे अर्फ अण्णा यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मित्रपरिवाराकडून आणि परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





