\n

 

\n

व्हायलर होणाऱ्या व्हिडिओमध्ये  हर्षवर्धन पाटील म्हणाले,’असे जे दलबदलू असतात, स्वार्थासाठी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलतात. ज्या पक्षात जातात त्यावर फारसं प्रेम आहे म्हणून नाही तर त्यांचा स्वार्थ त्यामागे असतो. असे जे आयाराम गयाराम असतात निवडणूक आली की त्यांची खूप चलती असते. बऱ्याचवेळा आयाराम गयारामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यांना जनता योग्य उत्तर देईल असं विधान त्यांनी केले आहे.

\n

दरम्यान, व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट करत त्यावर आयाराम की गयाराम? सहज विचारलं असं कॅप्शन देत हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढला आहे.

\n

तत्पूर्वी, हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की,’जनतेच्या मनात एकच आहे की मी निवडणूक लढवली पाहिजे. मी नुकताच  शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनीही मला सांगितले की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शरद पवारांनी मला विचारलं तुम्ही काय निर्णय घेणार? तुम्ही भाजपात आहात. त्यावर शरद पवार म्हणाले की जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन. हा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद घेईन. त्यानंतर निर्णय जाहीर करेन. असेही पाटील यांनी सांगितले. तुम्ही सांगा राष्ट्रवादीत जायचं का? त्यावर उपस्थितांनी होय आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारीच्या घोषणा दिल्या. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाणार हे आता निश्चित झालं आहे.

\n

पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, ‘मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो. त्यांची आणि माझी दीड ते दोन तास चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यानंतर मी पण माझी भूमिका मांडली. तसंच दोन महिने तुम्ही मांडलेली भूमिका या सगळ्यावर सविस्तर चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तालुक्यांतल्या लोकांचा जो आग्रह आहे त्याविरोधात मला जाता येणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला आहे, अन्याय सहन केला आहे. सामान्य माणसांनी माझी साथ सोडली नाही. तुम्ही सांगताय तो निर्णय मी घेतला तर तो व्यक्तिगत निर्णय होईल. त्यामुळे मला जनतेच्या प्रमाणे मला निर्णय घ्यावा लागेल. त्यावर मला देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या अडचणीही तुम्ही समजून घ्या, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. त्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेतली. असंही पाटील म्हणाले.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"आयाराम की गयाराम? राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/patil-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pritifulbandheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-group-mla-amol-mitkari-tweeted-a-video-and-took-a-swipe-at-harshvardhan-patal#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/patil-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-group-mla-amol-mitkari-tweeted-a-video-and-took-a-swipe-at-harshvardhan-patal#webpage","name":"आयाराम की गयाराम? राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-group-mla-amol-mitkari-tweeted-a-video-and-took-a-swipe-at-harshvardhan-patal","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-group-mla-amol-mitkari-tweeted-a-video-and-took-a-swipe-at-harshvardhan-patal#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/patil-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-group-mla-amol-mitkari-tweeted-a-video-and-took-a-swipe-at-harshvardhan-patal#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ajit-pawar-group-mla-amol-mitkari-tweeted-a-video-and-took-a-swipe-at-harshvardhan-patal","name":"आयाराम की गयाराम? राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल"}}]}}}

आयाराम की गयाराम? राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल