मोठी बातमी ! महायुतीमध्ये विधानसभेसाठी अजित पवार गट ‘एवढ्या’ जागेवर ठाम ; खुद्द अजित पवारांनीच दिली माहिती

Ajit Pawar group । राज्यात काही दिवसानंतर विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. मात्र या सामान्यसाठी कोणत्याही पक्षाकडून जागावाटप करण्यात आले नाही. दरम्यान, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील अजित पवार गटाकडून त्यांच्या जागा फिक्स केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्या सोबत असल्याचा अजित पवार यांनी दावा केला. काँग्रेसचे हिरामण खोसकर झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच आपल्या सोबत येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिलीय. यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचा उल्लेख अजित पवारांनी केला.
अजित पवार गट 60 जागांसाठी प्रयत्नशील Ajit Pawar group ।
पक्षाचे स्वतः चे 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन शेकाप एक आणि दोन अपक्ष या 60 जणांच्या व्यतिरिक्त आणखी देखील जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. महायुतीत आपल्याला ज्या जागा मिळतील त्या जागांवर जास्तीत जास्त काम करा इतर जागांवर थोडं काम कमी केलं तरी हरकत नाही असाही स्पष्टपणे उल्लेख त्यांनी केला.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात Ajit Pawar group ।
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्यात आलीय. मात्र भाजपने 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, “जागेच्या हट्टापेक्षा जी जागा जो पक्ष जिंकून येऊ शकतो त्यांनी लढावी अशी भूमिका आमची आहे. हट्टाने जागा घेणे व पुढे ती जागा पराभूत होणे हे होणार नाही यासाठी तिन्ही पक्ष पारदर्शकतेच्या चर्चा करून तोडगा काढत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.
हेही वाचा
भाजपला मोठा झटका..! दोन ज्येष्ठ नेत्यांनी दिला ‘राजीनामा’





