Sanjay Deshmukh passes away : अजित पवारांना धक्का! जवळच्या सहकाऱ्याची अकाली एक्सिट; संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sanjay Deshmukh passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अकाली एक्सिटने राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात शोक पसरला आहे. मुंबईतील वरळी येथे त्यांंची प्राणज्योत मालवली.
अजित पवार यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त एक्सवरून पोस्ट शेअर करत दिले आहे. त्यांच्या जाण्याने दुःख झाल्याच्या भावनाही त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केली आहे. देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी साडेआठ वाजता मुंबईतील दादर येथे अंत्यविधी होणार आहे. संजय देशमुख हे मुंबईतील वरळी येथे राहत होते. मागणी दहा वर्षांपासून अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते काम पाहत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.
अजित पवारांची पोस्ट
मागील दहा वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारे श्री. संजय देशमुख यांच्या आकस्मिक निधनानं अतीव दुःख झालं. त्यांच्या जाण्यानं समर्पक आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी मी गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझे कुटुंबिय सहभागी आहोत.
मागील दहा वर्षांहून अधिक काळ माझे जनसंपर्क अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे काम पाहणारे श्री. संजय देशमुख यांच्या आकस्मिक निधनानं अतीव दुःख झालं. त्यांच्या जाण्यानं समर्पक आणि सखोल लिखाण करणारा एक विश्वासू, अनुभवी सहकारी मी गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.… pic.twitter.com/klH4cWWjTW
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 13, 2025
कोण होते संजय देशमुख?
संजय देशमुख मूळचे सातारा जिल्ह्यातील उंब्रज गावचे रहिवाशी होते. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ओएसीडी म्हणून काम केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांचे पत्रकारांशी चांगले नातेसंबंध होते.





