अजित पवारांच्या जीवाला धोका ; गुप्तविभागाकडून अलर्ट जारी, ‘या’ दौऱ्यावेळी विशेष काळजी घेण्याच्या सूचना

Ajit Pawar Danger to life । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची ‘जनसन्मान यात्रा’ सुरु आहे. नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करून राज्यभर आपला प्रचार करणार आहेत. अजित पवारांच्या या दौऱ्यात त्यांना धोका असून मालेगाव दौऱ्यावेळी विशेष काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार उद्या मालेगाव, धुळे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याची गुप्त वार्ता विभागाची पोलीस प्रशासनाला सूचना आहे. गुप्तवार्ता विभागाकडून वरील भागात धोकादायक हालचाली अनेक दहशतवादी संघटनांकडून असल्याने विशेष काळजी घेण्याची सूचना देण्यात आलीय. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांची अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
जनसन्मान यात्रेला मोठा प्रतिसाद Ajit Pawar Danger to life ।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. मात्र या यात्रेपेक्षा सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती अजित पवारांच्य ‘गुलाबी राजकारणा’ची…या दौऱ्यादरम्यान जिथे अजित पवारांची सभा होणार आहे. तेथील गुलाबी रंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा गुलाबी रंग अजित पवारांच्य जॅकेटवर, वाहनांवर, मंडपामध्ये सगळीकडे वापरण्यात आला आहे. यात्रेत सहभागी होणारे मंत्री, पदाधिकारी यांच्यासाठी दोन-तीन व्हॅनिटी वाहने गुलाबी रंगाचे आहेत. याशिवाय काही छोटी वाहनेही गुलाबी असून या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसह इतर शासकीय योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे.
मालेगाव संवेदनशील भाग Ajit Pawar Danger to life ।
राज्यात मालेगावची संवेदनशील भाग म्हणून ओळख आहे. जातीयवादी दंगलीमुळे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जात आहे. किरकोळ कारणांवरुन यापूर्वी मालेगावात जातीय दंगली भडकलेल्या आहेत. मालेगाव तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या शहरासह तालुक्यात काँग्रेसह समाजवादी पक्षाचे वर्चस्व राहिले आहे.





