Bangladesh Violence: अजित डोवाल यांनी घेतली शेख हसीनांची भेट
Updated On:

Bangladesh Violence – बांगलादेश हवाई दलाच्या लष्करी वाहतूक विमानातून प्रवास करून शेख हसीना यांनी त्यांचा देश सोडला. त्यांचे विमान उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील हिंडन हवाई तळावर उतरले. तिथे शेख हसीना यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट घेतली.
मात्र, त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. त्या भारतात आश्रय घेण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते. लंडनला जाण्याची त्यांची योजना असल्याचे समजते.
बांगलादेशने केलेली विनंती मान्य करून शेख हसीना यांना भारतीय हवाई हद्दीतून सुरक्षितपणे प्रवास करू देण्याचा निर्णय भारताने घेतल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. त्या नेमक्या कुठे आश्रय घेणार याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.





