अजिंक्य ननावरे आणि शिवानी सुर्वे यांचा पार पडला साखरपुडा; सुंदर लुकने वेधले साऱ्यांचे लक्ष

Ajinkya Nanavare and Shivani Surve: मागील वर्षात सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांनी लग्नगाठ बांधली. यानंतर आता यंदाच्या 2024 या वर्षात अभिनेता अजिंक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे ही जोडी देखील विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. नुकताच शिवानी आणि अजिंक्यचा साखरपुडा संपन्न झाला आहे. 31 जानेवारी रोजी दोघांचा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे मागील अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघांच्याही रिलेशनची सोशल मीडियावर अनेकदा रंगली होती. पण त्यांच्या नात्याबाबत त्यांनी कधीही जाहीरपणे सांगितले नाही. काही दिवसांपूर्वी शिवानीने सोशल मीडियाद्वारे काही पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्यानंतर चाहत्यांनी ही जोडी लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची अंदाज लावला होता.
View this post on Instagram
शिवानीने लग्नाचे फोटो ‘अखेर बंधनात अडकलो’ असं कॅप्शन देत अभिनेत्रीने साखरपुड्याची पोस्ट शेअर केली आहे. साखरपुड्यात शिवानी आणि अजिंक्य हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. साखरपुड्यात शिवानीने फिकट जांभळ्या रंगाची फॅन्सी साडी परिधान केलेली दिसत आहे. तर त्यावर तिने हिरव्या बांगड्या घातल्या आहे.
तर अजिंक्यने पांढऱ्या रंगाचा कुर्ता, सलवार, जॅकेट आणि त्यावर टोपी घातली होती. अभिनेत्याचा हा लूक खूपच सुंदर दिसत होता. अंगठी घालताना दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत येत असून दोघांच्याही साखरपुड्याच्या फोटोची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
सध्या या दोघांच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजिंक्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. तर शिवानी नुकतीच ‘वाळवी’ आणि झिम्मा 2 ‘ या चित्रपटांमध्ये झळकली होती.





