अजय महाराज बारस्कर यांचे सागर बंगल्याबाहेर ठिय्या ; देवेंद्र फडणवीसांची भेट न झाल्याने आंदोलन

Ajay Maharaj Barskar । राज्यातील आरक्षणाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. त्यातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले असून त्यांनी आजपासून उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर हेसुद्धा पुन्हा आक्रमक झाले असून ते थेट सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेरच त्यांनी आपले ठिय्या आंदोलन सुरू केल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्यामुळे ते सागर बंगल्याबाहेरील ओट्यावर बसले होते. मात्र काही वेळानंतर त्यांना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ बारस्कर यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. त्यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या 65 एकरवरील भक्तिसागर पार्कमध्ये पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. त्यावेळी, एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली होती. त्यानंतर, आज अजय महाराज बारस्कर हे थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याचं दिसून आलं.
पोलिसांनी घेतलं ताब्यात Ajay Maharaj Barskar ।
बारस्कर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडून बसले होते. मात्र, त्यांना याठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, येथेही त्यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले असून आपणही मराठवाड्यातील सर्वच युवकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
गाडी जळाल्याची पोलिसांत तक्रार Ajay Maharaj Barskar ।
दरम्यान, गाडी जळाल्यानंतर अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे. या दुर्घटनेत 1 लाखांचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला होता. त्यामध्ये, बारस्कर याना शिवीगाळ आणि धमकी देण्यात येत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
हेही वाचा
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांचा आणखी एक दमदार कामगिरी; वयाच्या ६१ व्या वर्षी पूर्ण केली PhD





