Tamil Nadu Premier League 2024 : क्रिकेटमध्ये असे अनेकदा बोलले जाते की, आता गोलंदाज आणि गोलंदाजी पूर्वीसारखी राहिली नाही. असे म्हणतात की, पूर्वीचे गोलंदाज सध्याच्या गोलंदाजांपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत असत. मात्र तरीही क्रिकेट विश्वात असे अनेक गोलंदाज आहेत जे उत्कृष्ट वेगाने गोलंदाजी करतात. असे अनेक युवा गोलंदाजही उदयास येत आहेत, जे आपल्या वेगाने लोकांना प्रभावित करत आहेत. तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये आज एक असा चेंडू पाहायला मिळाला ज्यामुळे स्टंपचे जागीच दोन तुकडे झाले.
तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये टाकलेला हा चेंडू आणि त्याचा वेग खरोखरच पाहण्यासारखा होता. हा चेंडू मदुराई पँथर्सचा वेगवान गोलंदाज अजय कृष्णाने टाकला. या स्पर्धेत मदुराई पँथर्स आणि कोवई किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला.
मदुराई पँथर्सच्या अजय कृष्णाने डावाच्या 12व्या षटकातील पहिला चेंडू यष्टीच्या रेषेवर टाकला. फलंदाजाने अजयचा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क न झाल्याने चेंडू सरळ जाऊन मधल्या यष्टीला (स्टम्प,Stump) लागला. चेंडूचा वेग इतका जास्त होता की मधल्या यष्टीचे (Middle Stump) जाग्यावरच दोन तुकडे झाले.
Kuchi Paathu Podu 🔥ft. Ajay Krishna@TNCACricket @maduraipanthers #TNPL2024 #NammaOoruAatam #NammaOoruNammaGethu pic.twitter.com/N8nbj8jFf6
— TNPL (@TNPremierLeague) July 23, 2024
स्टंपचा एक भाग हवेत उडून बराच अंतरावर मागे पडला, तर दुसरा भाग जमिनीत अडकला. हा चेंडू खरोखरच पाहण्यासारखा होता. या नेत्रदीपक चेंडूचा व्हिडिओ तामिळनाडू प्रीमियर लीगच्या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे.
Kuchi Paathu Podu 🔥ft. Ajay Krishna@TNCACricket @maduraipanthers #TNPL2024 #NammaOoruAatam #NammaOoruNammaGethu pic.twitter.com/N8nbj8jFf6
— TNPL (@TNPremierLeague) July 23, 2024
अजय कृष्णाने सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली. त्याने 3 षटकात 4 बळी घेतले. या काळात त्याने केवळ 20 धावा दिल्या. मात्र तरीही अजयच्या संघाला सामना गमवावा लागला. कोवई किंग्जने हा सामना 43 धावांनी जिंकला.