Ajay Devgn: अजय देवगणची छोट्या पडद्यावर दमदार एन्ट्री, ‘क्राइम पेट्रोल’चे करणार सूत्रसंचालन
Ajay Devgn : बॉलीवूडचा 'सिंघम' 'क्राइम पेट्रोल'मध्ये

Ajay Devgn : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने टेलिव्हिजनवरही दमदार एन्ट्री केली आहे. ‘क्राईम पेट्रोल’च्या आगामी सीझनचा नवा प्रोमो रिलीज झाला असून यात तो सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे.
अभिनेता अनूप सोनी यांची जागा घेत अजय देवगण टीव्हीवर होस्ट म्हणून डेब्यू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. चाहते देखील अजयला टीव्हीवर पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
या शोच्या प्रोमोमध्ये अजय देवगण गुन्ह्यांशी संबंधित केस आणि त्यामागील सत्य यावर भाष्य करताना दिसत आहे. या शोचा नवीन सीझन येत्या 31 ऑगस्टपासून सुरू होत आहे. Ajay Devgn
व्हिडिओमध्ये अजय म्हणतो, “कधीकधी काही गोष्टी आपल्याला खोलवर अस्वस्थ करतात. आणि आज मला एका अशा सत्याचा सामना करावा लागला, ज्यामुळे मी थक्क झालो आहे. मी लवकरच ते तुमच्यासमोर उघड करेन.” प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अजय देवगणचे सूत्रसंचालक म्हणून स्वागत करण्यात आले आहे.
View this post on Instagram
15 एपिसोडचे चित्रीकरण आधीच पूर्ण
मोठ्या पडद्यावर ‘सिंघम’ बनून गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट करणारा अजय देवगण आता या क्राइम पेट्रोल शोद्वारे गुन्ह्यासंबधित कथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने या शोच्या 15 एपिसोडचे चित्रीकरण आधीच पूर्ण केले आहे.
याआधी रविवारी अजयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओद्वारे त्याने एका महत्त्वाच्या गोष्टीचे संकेत दिला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, तो ‘क्राइम पेट्रोल’बद्दलच बोलत आहे, असे त्याने स्पष्टपणे सांगितले नव्हते.
दुसरीकडे, अनुप सोनी याने बराच मोठा काळ ‘क्राइम पेट्रोल’चे सूत्रसंचालन केले आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आता अजय देवगण ही जबाबदारी सांभाळणार आहे. Ajay Devgn
हेही वाचा:





