Sanjay Dutt And Ajay Devgan | अभिनेता अजय देवगण आणि संजय दत्त हे दोघेही सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. लवकरच अजय ‘रेंजर’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट निर्माते लव रंजन आणि जगन शक्ती यांच्या या चित्रपटात अजयला कास्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये बॉलिवूडचा ‘खलनायक’ संजय दत्त त्याच्या अपोझिट भूमिकेत दिसणार आहे. हा एक जंगल अॅडव्हेंचर चित्रपट असणार आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार, चित्रपटाच्या कास्टिंग दरम्यान खलनायकाच्या भूमिकेसाठी उत्तम कलाकार शोधला जात होता. ज्यात संजय दत्त ‘खलनायक’ भूमिकेत दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. या चित्रपटासाठी निर्माते अजय देवगण आणि संजय दत्तचा खास लूक तयार करत आहेत. ज्यामध्ये तो फॉरेस्ट रेंजर किंवा रक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रेंजर’मध्ये नवीनतम व्हीएफएक्स वापरला जाईल. निर्माते २०२५च्या उन्हाळ्यात सिनेमाचे शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहेत. ‘चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम अजूनही सुरू आहे. रेंजरमधील दोघांचा आमनासामना मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा असणार आहे. Sanjay Dutt And Ajay Devgan | ‘रेंजर’ या चित्रपटाच्या उर्वरित कास्टचा शोध अजूनही चालू आहे. हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अजयने ‘रेंजर’ शूटिंग करण्यापूर्वी ‘दे दे प्यार दे २’ आणि ‘धमाल 4’ या दोन चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे. या व्यतिरिक्त त्याचा ‘रेड २’ हा चित्रपट मे महिन्यातही प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो ‘सन ऑफ सरदार 2’ मध्येही दिसणार आहे. Sanjay Dutt And Ajay Devgan | हेही वाचा: शिंदे गटाला भाजपकडून ‘दे धक्का’? ; थेट ठाण्यात जाऊन गणेश नाईकांचे उपमुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले,”‘ओन्ली कमळ’…”