ऐश्वर्याची ‘ती’ कृती सगळ्यांनाच भावली! नेटकरी म्हणाले ही तर खरी क्वीन! व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय बऱ्याचदा लाईमलाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत असली तरी तिच्या काही कृतींमुळे ती प्रकाशझोतात येत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या चाहत्यासाठी अशी काही कृती केली आहे की ज्यामुळे तिचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
अलिकडेच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसमध्ये पोहोचली होती. यावेळी ऐश्वर्या एका हॅाटेलबाहेर आल्यानंतर तिच्या गाडीकडे जाताना दिसते. मात्र, तिथे आलेल्या तिच्या फॅनला सुरक्षा कर्मी अटकाव करतात. यावेळी तिच्या फॅनला रडू येते. त्यानंतर ऐश्वर्या तिच्या फॅनला थेट घट मिठी मारते, असे व्हिडीओत दिसत आहे. तिच्या या कृतीचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. त्यानंतर ऐश्वर्या या फॅनसोबत फोटो काढले.
View this post on Instagram
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “ही ऐश्वर्या राय आहे. ती सर्वात सुंदर आणि दयाळू आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ती एक देवी आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ती खूप छान आणि काळजी घेणारी आहे.” इतर अनेक वापरकर्त्यांनी हृदयाच्या इमोजीसह व्हिडिओवर कमेंट केली आहे. थोडक्यात ऐश्वर्याची ही कृती सर्वांनाच भावली आहे.
हेही वाचा : बिहारमध्ये भाजपचा मोठा निर्णय ; महाराष्ट्रातील नेत्यांसह १९ नेत्यांची विशेष टीम स्थापन





